Mahabhulekh (महाराष्ट्र) – ७/१२ उतारा, ८अ, प्रॉपर्टी कार्ड, इ फेरफार , भू नक्षा आणि इतर लँड रेकॉर्ड ऑनलाइन बघा.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने 7/12 Mahabhulekh – Maharashtra Bhumi Abhilekh आणि इतर पोर्टल द्वारे जमिनीचे जवळपास सर्वच लँड रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे तुम्ही घर बसल्या काही निवडक सेवांचा उपयोग करू शकता.
पोर्टल | Mahabhulekh (Bhulekh Mahabhumi) |
कशासाठी | 7/12 Utara, 8A, Property Card, Bhu Naksha, Ferfar, & Other Land Records |
ने लाँच केले | महाराष्ट्र सरकार |
द्वारे व्यवस्थापित | महसूल विभाग, महाराष्ट्र शासन |
- सातबारा उतारा ७/१२ काय असतो?
- प्रॉपर्टी कार्ड काय असते?
- ७/१२ उतारा, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड online कसे पहावे?
- विना स्वाक्षरीतील आणि डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक यांच्यातील फरक
- डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड online कसे काढावे?
- फेरफार व फेरफाराची नोटीस म्हणजे काय?
- फेरफाराची नोटीस व स्थिती कशी बघावी?
- Mahabhulekh Contact Details – Helpline Number
सातबारा उतारा ७/१२ काय असतो?
सातबारा हा शेतजमिनीचा एक दस्तावेज आहे यात जमिनीची सर्व माहित असते जसे कि जमिनीच्या मालकाचे नाव, एकूण क्षेत्रफळ, प्रकार, सर्वे/गट नंबर, बोजा आणि इतर माहिती. जमिनीचे मालकी हक्क दर्शविणे किंवा जमिनीचे व्यवहार करायच्या वेळेस ७/१२ उतारा हा दस्तावेज उपयोगी पडतो.
प्रॉपर्टी कार्ड काय असते?
७/१२ उतारा हा शेत जमिनीसाठी असतो परंतु शहरांमध्ये शहरी कारणामुळे आणि इतर कारणामुळे आता शेत जमिनीचं उपलब्ध राहिल्या नाहीत, ह्या कारणामुळे महाराष्ट्र राज्य च्या भूमि अभिलेख विभागाने निर्णय घेतला आहे कि ज्या शहरांचे सिटी सर्वे झाला आहे त्या ठिकाणी ७/१२ उतारा बंद करण्यात येईल व त्याऐवजी Property Card वापरण्यात येईल.
७/१२ उतारा, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड online कसे पहावे?
अधिकृत Mahabhulekh वेबसाइटला भेट द्या
महाभूलेख हे आता भुलेख महाभूमि या पोर्टल वर स्थलांतरित झाले आहे. Bhulekh Mahabhumi हे महाराष्ट्र राज्याचे नवीन भूमि अभिलेख पोर्टल आहे जे नागरिकांना ७/१२ उतारा, ८अ, प्रॉपर्टी कार्ड आणि इतर जमिनीशी संभंधित सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देते.
Go to Mahabhulekh (Bhulekh Mahabhumi) Homepage >
Page – bhulekh.mahabhumi.gov.in
Step 1 – विभाग निवडा (Select Division)-
भुलेख महाभूमि पोर्टल वर आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या सूची मधून तुमचा विभाग निवडायचा आहे. विभाग निवडल्यावर तुम्हाला त्या विभागाकडे पुनर्निर्देशित करण्यात येईल.
खाली आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्य च्या विभागांची आणि त्यात येणाऱ्या शहरांची व जिल्यांची यादी दिली आहे.
Amravati (अमरावती) –> | अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम |
Aurangabad (औरंगाबाद) –> | औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली |
Kokan (कोकण) –> | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
Nagpur (नागपूर) –> | भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा |
Nashik (नाशिक) –> | अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक |
Pune (पुणे) –> | कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर |
Step 2 – दस्तावेज आणि जमीन निवडा –
- ७/१२ उतारा ✔
- ८अ
- मालमत्ता पत्रक (Property Card)
आता तुम्हाला जमीनीचा जो दस्तावेज हवा आहे तो निवडा जसे कि ७/१२, ८अ किंवा मालमत्ता पत्रक. तुम्ही जो दस्तावेज निवडला आहे त्यानुसार तुम्हाला वेग-वेगळी माहिती द्यावी लागेल उदाहरणासाठी आपण ७/१२ बघत आहोत. त्यानंतर तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जिल्हा, तालुका आणि गाव (Area) निवडा.
जमीन शोधण्यासाठी सर्वे/गट नंबर किंवा संपूर्ण नाव या पर्यायाचा उपयोग करा नंतर सूची मधून तुमच्या जमिनीचा सर्वे/गट नंबर निवडा आणि तुमचा मोबाइल नंबर टाकून ७/१२ पहा बटनावर क्लिक करा.
Step 3 – Captcha भरा –
फोटो मध्ये जे अक्षर दिसत आहे त्यांना रिकाम्या बॉक्स मध्ये लिहा आणि Verify Captcha to View 7/12 या बटनावर क्लिक करा.
Step 4 – ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक बघा –
शेवटी तुमच्या समोर तुम्ही जो दस्तावेज निवडला होता तो येईल. या विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीची संभंधित सर्व माहिती मिळेल.
Check 7/12, 8A & Property Card
सूचना (Notice) –
- पण लक्ष्यात ठेवा विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक तुम्हाला केवळ माहितीपूर्ण कामासाठीच वापरता येईल. यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का नसल्यामुळे तुम्हाला याचा वापर सरकारी किंवा अधिकृत कामासाठी करता येणार नाही.
- जर का सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापरायचा असेल तर त्यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का घ्यावा किंवा तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक देखील ऑनलाइन मिळवू शकता पण ते केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध असतात.
विना स्वाक्षरीतील आणि डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक यांच्यातील फरक
विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक | डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, इ फेरफार, मालमत्ता पत्रक |
स्वाक्षरी नसलेली कागदपत्रे जवळपास सर्व शहरांसाठी उपलब्ध आहेत. | डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे ही केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध आहेत. |
विना स्वाक्षरीतील कागदपत्रे केवळ माहितीपूर्ण कामासाठी वापरता येईल. | डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे सरकारी आणि कुठल्याही अधिकृत कामासाठी वापरता येईल. |
Free मध्ये मिळतात | प्रत्येकी Rs 15 रु फीस लागते |
Bhulekh Mahabhumi पोर्टल वर उपलब्ध आहे | DigitalSatbara पोर्टल वर उपलब्ध आहे |
डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड online कसे काढावे?
(डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे ही केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध आहेत)
अधिकृत DigitalSatbara वेबसाइटला भेट द्या
डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे काढण्यासाठी तुम्हाला DigitalSatbara या पोर्टल वर जावे लागेल. डिजिटल सातबारा पोर्टल तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देते. तसेच हीच कागदपत्रे तुम्ही या पोर्टल वर पडताळून (Verify) बघू शकता.
Go to DigitalSatbara Homepage >
Page – digitalsatbara.mahabhumi.gov.in
Step 1 – रजिस्ट्रेशन आणि लॉगिन –
डिजिटल सातबारा या पोर्टल वर तुम्ही जर नवीन User असाल तर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावे लागेल ते तुम्ही खालील माहिती भरून तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता. अन्यथा तुम्ही जर जुने User असाल तर लॉगिन करा.
- Personal Information
- Address Information
- Login Information
वरील माहिती भरून झाल्यावर रेजिस्ट्रेटन करून घ्या त्यानंतर तुम्ही बनवलेल्या User ID आणि Password चा वापर करून या पोर्टल वर लॉगिन करून घ्या.
Step 2 – Account रिचार्जे करा आणि दस्तावेज निवडा –
डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी Rs १५ रुपये चार्जेस द्यावे लागतील त्यानुसार तुम्ही Account रिचार्जे करा.
अकाउंट रिचार्जे केल्यावर तुम्हाला जो दस्तावेज हवा आहे तो निवडा. उदाहरणासाठी आपण डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ कसा काढायचा बघत आहोत.
- Digitally Signed 7/12, 8A, eFerfar & Property Card
Step3 – माहिती भरा आणि डाउनलोड करा –
आता तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. त्यानंतर जमिनीचा सर्वे/गट नंबर सर्च करा आणि निवडा. शेवटी Download या बटनावर क्लिक करा जेणे करून तुमचा डिजिटल स्वाक्षरीतलं ७/१२ डाउनलोड होईल.
Download 7/12, 8A, eFerfar & Property Card
सूचना (Notice) –
- डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड वर तलाठी स्वाक्षरी आणि शिक्का असल्याने याचा वापर तुम्ही कुठल्याही सरकारी व अधिकृत कामासाठी करू शकता.
- जर का तुमचे शहर किंवा कागदपत्रे डिजिटल सातबारा पोर्टल वर उपलब्ध नसेल तर तुम्ही विना स्वाक्षरीतील कागद पत्रे काढा.
फेरफार व फेरफाराची नोटीस म्हणजे काय?
फेरफार म्हणजे ७/१२ उतारा मध्ये बदल करणे किंवा दुरुस्ती करणे उदाहरणता जेव्हा जमिनीची खरेदी-विक्री होते तेव्हा जुन्या मालकाचे नाव ७/१२ ऱ्या वरून काढून त्या ठिकाणी नवीन मालकाचे नाव टाकणे.
फेरफाराची नोटीस म्हणजे जेव्हा कधी तलाठी कडे ७/१२ मध्ये बदल करणे म्हणजेच फेरफार करण्यासाठी अर्ज येतो. तेव्हा तलाठी अर्ज व दस्तावेज तपासून फेरफाराची नोटीस लावतो. हि नोटीस काही ठळक कालावधी साठी लावली जाते. जर का या फेरफार वर कुणाचा आक्षेप असेल तर तो नोटीस चा कालावधी संपण्या अगोदर फेरफाराला विरोध करू शकतो. जर आक्षेप नसेल तर कालावधी संपल्यावर तलाठी फेरफाराची पुढील प्रक्रिया राबवतो.
फेरफाराची नोटीस व स्थिती कशी बघावी?
फेरफाराची नोटीस व स्थिती बघण्यासाठी तुम्हाला आपली चावडी या पेज वर जावे लागेल. या पेज वर तुम्ही फेरफाराची नोटीस/स्थिती आणि अन्य माहिती बघू शकता.
Go to Aapli Chawdi Webpage >
Page – digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi
आपली चावडी वेबपेज वर गेल्यावर सातबारा विषयी हा पर्याय निवडून जिल्हा, तालुका आणि गाव (Area) निवडा. नंतर Captcha भरा व आपली चावडी पहा बटनावर क्लिक करा.
शेवटी तुमच्या समोर फेरफार ची सूची येईल यात तुम्हाला फेफफार नंबर, प्रकार, दिनांक, हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख, सर्वे/गट नंबर आणि इतर माहिती मिळते. त्यात तुमचा फेरफार शोध आणि त्या समोरील पहा बटनावर क्लिक करा आणि तुमच्या फेरफाराची स्तिथी जाणून घ्या.
Mahabhulekh Contact Details – Helpline Number
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालय तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे |
दूरध्वनी : ०२०-२६०५०००६ |
ई-मेल : dlrmah[dot]mah[at]nic[dot]in |
Visit Mahabhulekh Portal –> | bhulekh.mahabhumi.gov.in |
Visit Homepage –> | landowner.co.in |