Mahabhulekh (Maharashtra Bhumi Abhilekh) Check 7/12 Utara, 8A, Property Card, Ferfar, Bhu Nakasha, Mojni, and Other Land Records Online.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने 7/12 Mahabhulekh – Maharashtra Bhumi Abhilekh आणि इतर पोर्टल द्वारे जमिनीचे जवळपास सर्वच लँड रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे तुम्ही घर बसल्या ऑनलाइन सातबारा बघणे आणि जमिनीच्या काही निवडक सेवांचा उपयोग करू शकता.
पोर्टल | Mahabhulekh (Bhulekh Mahabhumi) |
कशासाठी | Online 7/12 Utara, 8A, Property Card, Bhu Naksha, Ferfar, & Other Land Records |
ने लाँच केले | महाराष्ट्र सरकार |
द्वारे व्यवस्थापित | महसूल विभाग, महाराष्ट्र शासन |
Land Services Available on Mahabhulekh
- ७/१२ उतारा, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड ✔
- डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड ✔
- महाभूलेख नकाशा (Bhu Naksha Maharashtra) ✔
- फेरफाराची नोटीस/स्थिती ✔
- जुना ७/१२, जुने फेरफार व नोंदवही, जुने प्रॉपर्टी कार्ड (Old Land Record) ✔
- Verify 7/12, 8A, Ferfar and Property Card
- Mahabhulekh Contact Details ✔
- सातबारा उतारा ७/१२ काय असतो?
- प्रॉपर्टी कार्ड काय असते?
- महाभूलेख: ७/१२ उतारा, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड online कसे पहावे?
- महाभूलेख: डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड online कसे काढावे?
- महाभूलेख: विना स्वाक्षरीतील आणि डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक यांच्यातील फरक
- महाभूलेख नकाशा (Bhu Naksha) कसा बघावा?
- महाभूलेख: जुना ७/१२, जुने फेरफार व नोंदवही, जुने प्रॉपर्टी कार्ड (Old Land Record) आणि इतर जुने दस्तावेज कसे काढावे?
- फेरफार व फेरफाराची नोटीस म्हणजे काय?
- महाभूलेख: फेरफाराची नोटीस व स्थिती कशी बघावी?
- Mahabhulekh Contact Details – Helpline Number
- State Wise: Land Records
सातबारा उतारा ७/१२ काय असतो?
सातबारा हा शेतजमिनीचा एक दस्तावेज आहे यात जमिनीची सर्व माहित असते जसे कि जमिनीच्या मालकाचे नाव, एकूण क्षेत्रफळ, प्रकार, सर्वे/गट नंबर, बोजा आणि इतर माहिती. जमिनीचे मालकी हक्क दर्शविणे किंवा जमिनीचे व्यवहार करायच्या वेळेस 7/12 उतारा (7/12 extract) हा दस्तावेज उपयोगी पडतो.
प्रॉपर्टी कार्ड काय असते?
७/१२ उतारा हा शेत जमिनीसाठी असतो परंतु शहरांमध्ये शहरी कारणामुळे आणि इतर कारणामुळे आता शेत जमिनीचं उपलब्ध राहिल्या नाहीत, ह्या कारणामुळे महाराष्ट्र राज्य च्या भूमि अभिलेख विभागाने निर्णय घेतला आहे कि ज्या शहरांचे सिटी सर्वे झाला आहे त्या ठिकाणी ७/१२ उतारा बंद करण्यात येईल व त्याऐवजी Mahabhulekh Property Card वापरण्यात येईल.
महाभूलेख: ७/१२ उतारा, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड online कसे पहावे?
अधिकृत Mahabhulekh वेबसाइटला भेट द्या
महाभूलेख हे आता भुलेख महाभूमिलेख या पोर्टल वर स्थलांतरित झाले आहे. Bhulekh Mahabhumi Abhilekh हे सातबारा उतारा महाराष्ट्र राज्याचे नवीन भूमि अभिलेख पोर्टल आहे जे नागरिकांना 7/12 Utara Online, ८अ, महाभूलेख प्रॉपर्टी कार्ड आणि इतर जमिनीशी संभंधित सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देते.
Go to Mahabhulekh (Bhulekh Mahabhumi) Homepage >
Page – bhulekh.mahabhumi.gov.in
Step 1 – विभाग निवडा (Select Division)-
भुलेख महाभूमि पोर्टल वर आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या सूची मधून तुमचा विभाग निवडायचा आहे. विभाग निवडल्यावर तुम्हाला त्या विभागाकडे पुनर्निर्देशित करण्यात येईल.
खाली आम्ही तुम्हाला 7/12 Online Mahrashtra राज्य च्या विभागांची आणि त्यात येणाऱ्या शहरांची व जिल्यांची यादी दिली आहे.
Amravati (अमरावती) –> | अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम |
Aurangabad (औरंगाबाद) –> | औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली |
Kokan (कोकण) –> | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
Nagpur (नागपूर) –> | भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा |
Nashik (नाशिक) –> | अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक |
Pune (पुणे) –> | कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर |
Step 2 – दस्तावेज आणि जमीन निवडा –
- ७/१२ उतारा ✔
- ८अ
- मालमत्ता पत्रक (Property Card)
आता तुम्हाला जमीनीचा जो दस्तावेज हवा आहे तो निवडा जसे कि ७/१२, ८अ किंवा मालमत्ता पत्रक. तुम्ही जो दस्तावेज निवडला आहे त्यानुसार तुम्हाला वेग-वेगळी माहिती द्यावी लागेल उदाहरणासाठी आपण ७/१२ बघत आहोत. त्यानंतर ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा तालुका आणि गाव (Area) पण निवडा.
जमीन शोधण्यासाठी सर्वे/गट नंबर किंवा संपूर्ण नाव या पर्यायाचा उपयोग करा नंतर सूची मधून तुमच्या जमिनीचा सर्वे/गट नंबर निवडा आणि तुमचा मोबाइल नंबर टाकून ७/१२ पहा बटनावर क्लिक करा.
Step 3 – Captcha भरा –
फोटो मध्ये जे अक्षर दिसत आहे त्यांना रिकाम्या बॉक्स मध्ये लिहा आणि Verify Captcha to View 7/12 या बटनावर क्लिक करा.
Step 4 – ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक बघा –
शेवटी तुमच्या समोर तुम्ही जो दस्तावेज निवडला होता तो येईल. या विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीची संभंधित सर्व माहिती मिळेल. तुमचा 7/12 utara in marathi online मिळेल.
Check 7/12, 8A & Property Card
सूचना (Notice) –
- पण लक्ष्यात ठेवा विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक तुम्हाला केवळ माहितीपूर्ण कामासाठीच वापरता येईल. यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का नसल्यामुळे तुम्हाला याचा वापर सरकारी किंवा अधिकृत कामासाठी करता येणार नाही.
- जर का सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापरायचा असेल तर त्यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का घ्यावा किंवा तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक देखील ऑनलाइन मिळवू शकता पण ते केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध असतात.
महाभूलेख: डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड online कसे काढावे?
(डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे ही केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध आहेत)
अधिकृत DigitalSatbara वेबसाइटला भेट द्या
डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे काढण्यासाठी तुम्हाला Digital 7/12 या पोर्टल वर जावे लागेल. डिजिटल सातबारा पोर्टल तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीतील 7 12 digital, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देते. तसेच हीच कागदपत्रे तुम्ही या पोर्टल वर पडताळून (Verify) बघू शकता.
Go to DigitalSatbara Portal >
Page – digitalsatbara.mahabhumi.gov.in
Step 1 – रजिस्ट्रेशन आणि लॉगिन –
डिजिटल सातबारा या पोर्टल वर तुम्ही जर नवीन User असाल तर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावे लागेल ते तुम्ही खालील माहिती भरून तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता. अन्यथा तुम्ही जर जुने User असाल तर लॉगिन करा.
- Personal Information
- Address Information
- Login Information
वरील माहिती भरून झाल्यावर रेजिस्ट्रेटन करून घ्या त्यानंतर तुम्ही बनवलेल्या User ID आणि Password चा वापर करून या पोर्टल वर लॉगिन करून घ्या.
Step 2 – Account रिचार्जे करा आणि दस्तावेज निवडा –
डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी Rs १५ रुपये चार्जेस द्यावे लागतील त्यानुसार तुम्ही Account रिचार्जे करा.
अकाउंट रिचार्जे केल्यावर तुम्हाला जो दस्तावेज हवा आहे तो निवडा. उदाहरणासाठी आपण डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ कसा काढायचा बघत आहोत.
- Digitally Signed 7/12, 8A, eFerfar & Property Card
Step3 – माहिती भरा आणि डाउनलोड करा –
आता तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. त्यानंतर जमिनीचा सर्वे/गट नंबर सर्च करा आणि निवडा. शेवटी Download या बटनावर क्लिक करा जेणे करून तुमचा Mahabhulekh 7/12 digital स्वाक्षरीत डाउनलोड होईल.
Download 7/12, 8A, eFerfar & Property Card
सूचना (Notice) –
- डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड वर तलाठी स्वाक्षरी आणि शिक्का असल्याने याचा वापर तुम्ही कुठल्याही सरकारी व अधिकृत कामासाठी करू शकता.
- जर का तुमचे शहर किंवा कागदपत्रे डिजिटल सातबारा पोर्टल वर उपलब्ध नसेल तर तुम्ही विना स्वाक्षरीतील कागद पत्रे काढा.
महाभूलेख: विना स्वाक्षरीतील आणि डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक यांच्यातील फरक
विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक | डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, इ फेरफार, मालमत्ता पत्रक |
स्वाक्षरी नसलेली कागदपत्रे जवळपास सर्व शहरांसाठी उपलब्ध आहेत. | डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे ही केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध आहेत. |
विना स्वाक्षरीतील कागदपत्रे केवळ माहितीपूर्ण कामासाठी वापरता येईल. | डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे सरकारी आणि कुठल्याही अधिकृत कामासाठी वापरता येईल. |
Free मध्ये मिळतात | प्रत्येकी Rs 15 रु फीस लागते |
Bhulekh Mahabhumi पोर्टल वर उपलब्ध आहे | DigitalSatbara पोर्टल वर उपलब्ध आहे |
महाभूलेख नकाशा (Bhu Naksha) कसा बघावा?
Go to MahaBhuNakasha Portal >
Page – mahabhunakasha.mahabhumi.gov.in
भू नकाशा म्हणजेच जमिनीचा नकाशा बघण्यासाठी तुम्हाला MahaBhuNakasha (Bhulekh Maharashtra) या पोर्टल वर जावे लागेल. सर्वात अगोदर ज्या जमिनीचा नकाशा तुम्हाला पाहिजे त्या जमिनीचे ठिकाण दिलेल्या सूची मधून निवडा. ठिकाण निवडल्यावर तुमचा जमिनीचा Plot No टाका आणि Search आयकॉन वर क्लिक करा किंवा दिलेल्या सूची मधून तो निवडा.
आता Plot Info मध्ये तुम्हाला त्या प्लॉट ची माहिती मिळेल ती तपासून पाहून खात्री करून घ्या आणि Map Report बटनावर क्लिक करा. Map Report (Bhulekh Naksha) मध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील Single Plot आणि All Plots of Same Owner या दोन्हीतून तुम्हाला जो हवा तो पर्याय निवडा त्यानंतर तुम्ही pdf फाईल ची Print काढू शकता किंवा ती डाउनलोड करू शकता.
महाभूलेख: जुना ७/१२, जुने फेरफार व नोंदवही, जुने प्रॉपर्टी कार्ड (Old Land Record) आणि इतर जुने दस्तावेज कसे काढावे?
Go to Aaple Abhilekh Portal >
Page > aapleabhilekh.mahabhumi.gov.in
जुने ७/१२ आणि इतर जुनी कागदपत्रे काढण्यासाठी Aaple abhilekh हे पोर्टल तुम्हाला वापरायचे आहे. या पोर्टल वर तुम्हाला सर्व प्रकारची जमिनीची जुनी कागदपत्रे मिळतात.
जर का तुम्ही हे पोर्टल पहिल्यांदा वापरत असाल तर Registration करून घ्या किंवा तुम्ही अगोदरच रजिस्टर असाल तर Login करून घ्या. रेजिस्ट्रेशन साठी तुम्हाला केवळ तुमची Personal Information, Addres आणि Login Information भरावी लागेल. रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुमची Login Information वापरून या पोर्टल वर लॉगिन करा.
आता Basic Search मध्ये तुम्हाला जमिनीच्या ठिकाणाचा पत्ता निवडायचा आहे तो तुम्ही सूची मधून निवडा आणि त्यानंतर तुम्हाला जो जुना दस्तावेज (Old Land Record) हवा आहे तो निवडा आणि Search बटनावर क्लिक करा.
Search Result मध्ये तुम्हाला Survey Number नुसार एक सूची दिसेल त्या मधून तुमचा दस्तावेज ओळखा आणि Add to Cart या बटनावर क्लिक करा.शेवटी Cart मध्ये जाऊन ती फाईल Download करा. आता तुम्ही ती फाईल ओपन करून पाहू शकता किंवा प्रिंट करू शकता.
सूचना (Notice) –
- जुनी कागदपत्रे (Old Land Record) फक्त काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध करण्यात आली आहे.
- जर का तुमचे शहर किंवा जुनी दस्तावेज या पोर्टल वर उपलब्ध नसेल तर तुम्ही ती तुमचा भूमि अभिलेख विभागात जाऊन अर्ज देऊन ती काढू शकता.
फेरफार व फेरफाराची नोटीस म्हणजे काय?
फेरफार म्हणजे ७/१२ उतारा मध्ये बदल करणे किंवा दुरुस्ती करणे उदाहरणता जेव्हा जमिनीची खरेदी-विक्री होते तेव्हा जुन्या मालकाचे नाव ७/१२ ऱ्या वरून काढून त्या ठिकाणी नवीन मालकाचे नाव टाकणे.
फेरफाराची नोटीस म्हणजे जेव्हा कधी तलाठी कडे ७/१२ मध्ये बदल करणे म्हणजेच फेरफार करण्यासाठी अर्ज येतो. तेव्हा तलाठी अर्ज व दस्तावेज तपासून फेरफाराची नोटीस लावतो. हि नोटीस काही ठळक कालावधी साठी लावली जाते. जर का या फेरफार वर कुणाचा आक्षेप असेल तर तो नोटीस चा कालावधी संपण्या अगोदर फेरफाराला विरोध करू शकतो. जर आक्षेप नसेल तर कालावधी संपल्यावर तलाठी फेरफाराची पुढील प्रक्रिया राबवतो.
महाभूलेख: फेरफाराची नोटीस व स्थिती कशी बघावी?
फेरफाराची नोटीस व स्थिती बघण्यासाठी तुम्हाला आपली चावडी या पेज वर जावे लागेल. या पेज वर तुम्ही फेरफाराची नोटीस/स्थिती आणि अन्य माहिती बघू शकता.
Go to apali chawadi (apli chawadi) Webpage >
Page – digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi
Aapli Chavdi वेबपेज वर गेल्यावर सातबारा विषयी हा पर्याय निवडून जिल्हा, तालुका आणि गाव (Area) निवडा. नंतर Captcha भरा व आपली चावडी पहा बटनावर क्लिक करा.
शेवटी तुमच्या समोर फेरफार ची सूची येईल यात तुम्हाला फेफफार नंबर, प्रकार, दिनांक, हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख, सर्वे/गट नंबर आणि इतर माहिती मिळते. त्यात तुमचा फेरफार शोध आणि त्या समोरील पहा बटनावर क्लिक करा आणि तुमच्या फेरफाराची स्तिथी जाणून घ्या.
Mahabhulekh Contact Details – Helpline Number
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालय तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे |
दूरध्वनी : ०२०-२६०५०००६ |
ई-मेल : dlrmah[dot]mah[at]nic[dot]in |
Visit Mahabhulekh Portal –> | bhulekh.mahabhumi.gov.in |
State Wise: Land Records
You can check 7/12 Utara online by giving basic details of land in Maharashtra.
तुमच्या जमिनीची माहिती देऊन तुम्ही ऑनलाइन ७/१२ उतारा काढू शकता.